अमळनेर (प्रतिनिधी) – येथील लायन्स क्लबच्या शाखेच्या स्थापनेला यावर्षी ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या सुवर्णजयंती महोत्सवी वर्षानिमित्त क्लबने भव्य लायन्स एक्सपो २०२० चे आयोजन केले आहे.
सदर एक्सपो २६ ते २९ मार्च या काळात छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाशेजारी प्रताप मिलच्या मैदानावर भरवले जाणार आहे. या एक्स्पोमध्ये हे स्वादिष्ट व दर्जेदार विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच नामांकित कंपन्यांचे स्वस्त व गृहपयोगी वस्तूंचे सुमारे १५० स्टॉल्स असतील. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्यातील प्रबोधनात्मक व व सकारात्मक मनोरंजनपर कलागुणांच्या प्रदर्शनासाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. ३५००० स्क्वेअर फुट च्या परिसरात बालकांसाठी विविध पाळणे, झुले व नाविन्यपूर्ण प्ले झोन असेल. विशेष म्हणजे एक्स्पोमध्ये सर्वांना प्रवेश निशुल्क असेल .शालेय विद्यार्थ्यांना एक लाख लकी ड्रॉ चे कुपन मोफत देण्यात येणार आहेत. त्यातून रोज १०० पेक्षा जास्त बक्षिसांचे वितरण होईल. नामांकित कंपन्या व दुकानदारांचे डिस्काऊंट कुपन सुद्धा या कार्यक्रमात देण्यात येणार आहेत .एक्सपो मधून मिळालेल्या उत्पन्नातून अमळनेरला डायलिसीस मशिन सुविधा उपलब्ध करून देण्याचा क्लब चा मानस आहे. एक्स्पोमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निशामक यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरा, होमगार्ड, बाउन्सर, सिक्युरिटी ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एक्पोच्या यशस्वीतेसाठी क्लबचे सर्व सदस्य सुमारे महिनाभरापासून परिश्रम घेत आहेत.