अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचा बंदोबस्त व्हावा नागरिकांची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील भरवस गावा जवळ महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांनी जीवघेणा हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार काल अमळनेर तहसीलदार मिलिंद वाघ यांना वाळू अवैद्य रित्या वाहतूक होत असल्याची खबर मिळताच त्यांनी आपले कर्मचारी पथक यांना वाळू चोरी करणाऱ्या माफियांना पकडण्यासाठी पाठविले होते, पैकी लोण मार्गे दोन कर्मचारी व भरवस मार्गे दोन कर्मचारी सदर वाळूमाफीनां पकडण्यासाठी गेले असता भरवस गावा जवळील रेल्वे बोगद्या जवळ किमान 10 ते 15 जणांचा टोळक्यांनी रेतीवाहन अडवल्याचा राग आल्याने महसूल कर्मचारी आशिष पारधी, हर्षवर्धन मोरे व धीरज देशमुख आप्पा यांना दगड व फावड्या च्या दांड्यानी जबर मारहाण केली व त्यांच्या मोटरसायकल ची चावी काटेरी झुडपात फेकून दिली व पसार झाले. सदर घडलेल्या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सीमा अहिरे तहसीलदार वाघ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कर्मचारी यांना प्रथम दवाखान्यात घेऊन गेले व नंतर मारवाड पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्याची तक्रार दाखल केली.
सदर वाळूमाफीया हे बेटावद व परिसरातील असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे कळते त्या पैकी बबलू राजेंद्र तायडे याची ओळख पटली आहे, यांच्यावर भादवी 353, 307, 379,324,337, 323,504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि राहुल फुला करीत आहे
प्रांताधिकारी यांच्या 144 कलमाच्या आदेशाचे सर्रास पायमल्ली होतांना दिसत आहे तर तहसिल कार्यालयातुन वाहने चोरून घेऊन जाण्या इतपत मजल गेली आहे. दिवसा ढवळ्या रेतीची वाहतूक वाढली आहे .
महसूल च्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा कोण पुरविणार ? यांच्या वर पायबंद कसा घालावा ? वाळूमाफी यांची मुजोरी कशी संपवावी ? या प्रश्नाचे उत्तर फक्त एकच आहे ते म्हणजे अमळनेर मध्ये सैन्याला पाचरण करावे लागणार तेंव्हाच वाळू माफी यांवर वचक बसेल की काय ? अशी चर्चा तालुक्यात होतांना दिसत आहे.
दोन नंबर च्या धंद्यात मिळणारा बक्कळ पैश्या मुळे तरुण तिकडे वळत असल्याने गुन्हेगारी वाढत आहे, या तरुणांना काही राजकीय नेत्यांचे पाठबळ तर मिळत नाही ना ? अशी शंका सुद्न्य नागरिक करतांना दिसत आहे, तर ऐकीकडे पोलीस प्रशासनात कमी असलेले संख्याबळ हे ही वाढत्या गुन्हेगारीला पोषक वातावरण निर्माण होत आहे.