नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशभरात लॉकडाऊन अद्यापही चालूच आहे. मात्र, चौथ्या लॉकडाऊनमध्ये सरकारने काही निर्बंध शिथिल केले आहेत. यानुसार, लवकरच देशांतर्गत विमानसेवाही सुरु करण्यात येणार आहे.
देशामध्ये सोमवारपासून टप्प्याटप्प्याने देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली. यासाठी एएआय (Airports Authority of India) कडून विमान प्रवास करण्यासंदर्भात एसओपी (Standard Operating Procedure) जारी करण्यात आले आहे. विमान प्रवास करताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.
एयरपोर्ट अथॉरिटीने जारी केलेल्या नव्या एसओपी
– प्रवाशांना दोन तासाआधी विमानतळावर उपस्थित राहावे लागेल.
– प्रवाशांना थर्मल स्क्रीनिंग करणे आवश्यक असेल.
– प्रवाशांना मास्क आणि ग्लोज घालणे देखील अनिवार्य आहे.
– सर्व प्रवाशांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप असणे आवश्यक आहे.
– १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आरोग्यसेतू आवश्यक नाही आहे.
– प्रवासादरम्यान मिळणार खाद्यपदार्थ कोव्हिड संदर्भातील खबदारी घेऊनच देण्यात येतील.
– विशेष प्रकरणे वगळता प्रवाशांना ट्रॉली मंजूर होणार नाही.
– विमानतळावर प्रवाशांना नेण्यासाठी फक्त निवडलेल्या कॅब सेवा आणि खासगी वाहनांना परवानगी देण्यात येईल.
– विमानतळाच्या संचालकांना प्रवाशांच्या सामानाच्या सॅनिटायझेशनसाठी देखील व्यवस्था करावी लागेल.
ANI
✔
@ANI
Passengers would not be permitted to consume eatables inside the aircraft during the flight. No paper or magazines to be available in the aircraft: Ministry of Civil Aviation (MoCA) https://twitter.com/ANI/status/1263360527251562497 …
View image on Twitter
ANI
✔
@ANI
Ministry of Civil Aviation issues general instructions for domestic travellers. Only those passengers with confirmed web check-in will be allowed to enter the airport. Passengers will be required to wear protective gear (face mask). Only one check-in bag will be allowed.







