नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील लॉक डाऊन च्या चोथ्या टप्प्यात बऱ्यापैकी शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाने प्रत्यक्ष काम करायला काय हरकत आहे? असा सवाल प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी विचारला आहे.

देशातील अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी तसेच व्यवसाय-उद्योगधंद्याला चालना मिळण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे आता न्यायालयाच्या कामकाजामध्येही बदल करण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी ट्विटरवर व्यक्त केले आहे. प्रशांत भूषण यांनी सोशल डिस्टसिंगच्या नियमाचे पालन करत न्यायालयातील प्रक्रिया आता सुरू करायला काही हरकत नसल्याचे म्हटले आहे.
Prashant Bhushan
✔
@pbhushan1
There is no reason for the courts not to function physically now instead of unsatisfactory video conferencing. Judges can sit 2 meters away from each other & they may allow only lawyers involved in the case (1 Sr & 1 junior)& 1 litigant for each party. And videostream proceedings
745
11:13 AM – May 21, 2020
Twitter Ads info and privacy
206 people are talking about this
कोरनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. शाळा, कॉलेज, मंदिर, मस्जिद, बाजार, रेल्वे, वाहतूक, कोर्ट आणि इतर सार्वजनिक ठिकाणे सरकारने बंद केली होती. पण चौथ्या लॉकडाउनमध्ये नियमांत शिथिलता देऊन अनेक ठिकाणे उघडण्याची परवानगी दिली आहे. त्याच पार्शभूमीवर प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी सोशल डिस्टिंगचे पालन करत न्यायालयाचे कामकाज चालू ठेवायला काय हरकत आहे असा प्रश्न विचारला आहे.







