जळगाव ( प्रतिनिधी )
बाप आणि लेकीसारख्या नात्याला व पोलीस खात्यालाही मान खाली घालायला लावणाऱ्या घटनेत पोलीस विभागात नोकरीं करणाऱ्या चुलत्यानेच त्याच्या पुतणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना जळगाव तालुक्यातील लोणवाडी येथे घडली
आरोपी पोलीस कर्मचारी जळगाव तालुक्यातील लोणवाडी येथील रहिवाशी असून सध्या तो पहूर पोलीस ठाण्यात बदली झाली असुन हजर झाले नाही असे सांगण्यात आले आहे.
रविवारी रात्री उशिरा या पोलीस काका आरोपी विरोधात त्याच्या पीडित पुतणीच्या फिर्यादीवरून बलत्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पीडित मुलगी ही काका पासून तीन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती सुत्रांकडून कळाली आहे. सदर पीडित मुलेचे लग्न होऊन आठ दिवस झाले आहे. गर्भवती नवविवाहिता आपली पत्नी असल्याचे नव-याला समजल्या नंतर पीडित मुलीने नव-याला सर्व हकीकत सांगितल्यावरुन पती सोबत जाऊन पोलीस काका विरुद्ध काल रात्री उशिरापर्यंत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
सदर पोलीस काका हा फरार असुन त्याचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे यांनी डीबी पथकसह , इतर पोलीस पथक शोध घेत आहे.