• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भोकर येथील बालकाचा मृतदेह पाचव्या दिवशी आढळला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 16, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील भोकर येथील ११ वर्षीय बेपत्ता रोहित नवल सैंदाणे या बालकाचा मृतदेह पाचव्या दिवशी गावाजवळील एका मक्याच्या शेतानजीकच्या छोट्याशा रस्त्याच्या बाजूला सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आढळला. यावेळी बालकाच्या अंगावर फक्त अंडरपँड होती. तर मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने दुर्गंधी येत होती. या घटनेत घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भोकर येथील सेंटीग काम करणारे नवल गुमान सैंदाणे यांचा मुलगा रोहित हा मुलगा १२ रोजी गावातील एका लग्न समारंभात सायंकाळपर्यंत पगतीत जेवण वाढत होता. सायंकाळी ५ वाजेपासून तो बेपत्ता झाला. याबाबत त्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. गावातील भगवान वामन सोनवणे हे शेतकरी सोमवारी सकाळी शेतात काम करण्यासाठी गेले होते. यावेळी काही अंतरावरुन दुर्गंधी येत होती. ही दुर्गंधी कशाची? हा शोध घेण्याचा प्रयत्न शेतकर्‍याने केला, असता त्यांना एक मृतदेह आढळला. त्यांनी हा मृतदेह गावातील रोहितचा असल्याचे ओळखले. यासंदर्भात त्यांनी गावात कळवले असता काही वेळातच घटनास्थळी ग्रामस्थ पोहचले. रोहितच्या मृतदेहाच्या काही अंतरावर शौचास जाण्यासाठीचा पाण्याचा डबा आढळला. परंतु, घटनास्थळ लक्षात घेता गावातील बालक शौचाला एवढ्या लांब आणि शेतात येणार नाही. तसेच गावातून तो फक्त अंडरपँडवर येवू शकत नाही. त्यामुळे या संशयास्पद घटनेत घातपात झाल्याची दाट शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली. या बालकासोबत अनैसर्गिक कृत्य (कुकर्म) झाले असावे. किंवा नरबळी, जादूटोणा आदी प्रकारातून या बालकाचा बळी गेल्याचाही संशय आहे. मृतदेह आढळल्याचे कळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळाकडे तपासकामी रवाना झाला आहे. त्याठिकाणी पोलिसांचे डॉग स्कॉडने तपास केला. पोलीस पंचनाम्यानंतर या बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. रोहितच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांनी या घटनेमुळे आक्रोश केला.


 

 

Previous Post

जगभरात कोरोना साथीची काय अवस्था ?

Next Post

मुस्लीम संघटनांची आंदोलने मागे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुस्लीम संघटनांची आंदोलने मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात
1xbet russia

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन

July 24, 2026
सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी
1xbet russia

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी

July 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon