मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबई करोनाचे हॉटस्पॉट झाले असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. सामान्य नागरिकांसह पोलिसांनाही करोनाची लागण होत आहे. मात्र, आता एका महिला आयएएस अधिकारी आणि तिच्या पतीलाही करोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे.
मुंबईतील मंत्रालयाजवळील यशोधन या इमारतीत शासकीय आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचे निवासस्थान आहे. यामधील एका आयएएस महिला अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेच्या संपर्कात आल्यामुळे आयपीएस असलेल्या तिच्या पतीलाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे करोनाबाधित अधिकारी राहात असलेला मजला संपूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसेच या इमारतीतून कुणालाही बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.