नवी दिल्ली (वृत्तासंस्था) – गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर विरोधकांनी प्रश्न विचारत केंद्र सरकारला धारेवर धरले. त्यामुळे केंद्राने तातडीने सर्वपक्षीय बैठक घेत, सीमेवरील परिस्थितीची माहिती दिली. या बैठकीत पंतप्रधानांनी असाही दावा केला की, ‘चिनी सैन्याने भारतीय भूभागात घुसखोरी केली नाही.’ पंतप्रधानांच्या या दाव्यानंतर राहुल गांधी यांनी जर चिनी सैनिकांनी घुसखोरी केली नाही तर मग आमच्या जवानांना का मारण्यात आले असा सवाल केला आहे. याबरोबरच त्यांनी आणखी प्रश्न विचारून मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. पंतप्रधानांनी निवेदन केल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना दोन सवाल केले आहेत. चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केला. जर जमीन चीनची होती, असे म्हणत राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आमच्या जवानांना का मारण्यात आलं?, त्यांना कुठे मारण्यात आलं?, असे प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला विचारले आहेत. तसेच या प्रश्नांची उत्तरे आता पंतप्रधानांनी द्यावीत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
प्रत्यक्ष सीमारेषेवरील ताण कमी करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारत व चीनमध्ये लष्करी पातळीवर चर्चा सुरू होती. एकीकडे चर्चा सुरू असताना गलवान खोऱ्यात अचानक संघर्ष झाला. यात भारताचे २० जवान हुतात्मा झाले. २० जवानांच्या मृत्यूनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर विरोधकांनीही सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारने तातडीने विरोधकांशी चर्चा केली. त्याचबरोबर चीनने भारतीय भूभागात प्रवेश केला नसल्याचेही सांगितले. मोदींच्या या माहितीवरूनच राहुल गांधींनी आता सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.







