नवी मुंबई (वृत्तासंस्था) – भारत-चीनच्या संघर्षानंतर चीनचा गलवान खोऱ्यावरील दावा भारताने फेटाळून लावला आहे. तरीही चीनकडून सातत्याने गलवान खोरे आमचेच असल्याचा दावा केला जात आहे. यावर चीनला उत्तर द्यावेच लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, चीनने शुक्रवारी नवीन दावा केला गलवान खोरे आमच्याच हद्दीत आहे भारतीय सैन्याने सीमा रेषा ओलांडली. मोदी जी आपल्या भू भागावर चीन सरळ सरळ हक्क सांगतोय चायनाला उत्तर द्यावे लागेल. गलवान खोरे आमचे आहे आमचेच राहील, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, भारतीय जवान आणि चीनी सैनिकांमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीनंतर प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लगत असणाऱ्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यावेळी कोणीही भारताची सीमा ओलांडली नाही किंवा कोणतीही भारतीय चौकी शत्रूच्या हातात नाही, अशी ग्वाही पमतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मी सोबत झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले. मात्र या शूर जवानांनी भारतीय भूमीकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्यांना धडा शिकवला, असेही मोदींनी म्हंटले आहे.







