नवी दिल्ली (वृत्तासंस्था) – गलवान खोऱ्यात चीनशी झालेल्या संघर्षात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नाची सरबत्ती केली आहे. अशातच आता भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानेही पक्षाला घरचा आहेर दिला आहे. चीनने मागील वर्षी भारतासोबत केलेला डोकलाम करार रद्द केला आहे. अशा परिस्थितीत सत्य काय आहे, हे केंद्र सरकारने स्पष्ट केले पाहिजे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हंटले आहे.

न्यूयॉर्क टाईम्स सारख्या अमेरिका माध्यमांच्या स्रोतांच्या म्हणण्यानुसार, चीनने मागील वर्षी भारतासोबत केलेला डोकलाम करार संपुष्टात आणला आहे. ज्यामध्ये चीनने भूतानमधून सैन्य मागे घेत असल्याच्या कृतीवर भारताले ‘विजय’चा दावा केला होता. आता सूत्रांचे म्हणणे आहे की चीनने पीएलएने डोकलाममध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. अशात परराष्ट्र मंत्रालयाने परिस्थिती स्पष्ट करावी, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले आहे.







