उस्मानाबाद (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मात्र दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यातील तिन्हीही कोरोनाबाधित रुग्णाचे उपचारानंतरचे शेवटचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. यानंतर आता उस्मानाबाद जिल्हा हा कोरोनामुक्त झाला आहे.उमरगा येथिल 3 रुग्णाचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त झाले. त्या रुग्णांना आज मिळणार डिस्चार्ज मिळणार असल्याचे “कोरोना” उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. पंडीत पुरी यांनी सांगितले.