नागपूर (वृत्तसंस्था) – राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याच प्रमाणे नागपुरातील रुग्णही वाढताना दिसत आहेत. नागपूरात आज सकाळी 3 नव्या रुग्णांचा अहवाल कोरोना पोजिटिव्ह आला. या नव्या कोरोना रुग्णांमुळे नागपुरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 76 वर पोहचली आहे. रविवारी दिवसभरात शहरात 10 रुग्णांचा अहवाल कोरोना पोजिटिव्ह आला होता.आज सकाळी आलेले तीनही रुग्ण हे आधीच कोरेन्टाईन करण्यात आले आहेत. सातरंजीपुरा येथील कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे सातरंजीपुरा येथून कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 40 वर पोहचली आहे. तर 141 संशयितांचें अहवाल प्रलंबित आहे. कोरोना चाचणी अहवाल पोजिटिव्ह आल्यावर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नागपूर – एकूण पोजिटिव्ह नमुने – 76, मृत्यू – 01, रुग्णालयातून बरे होऊन सुट्टी – 12, रुग्णालयात उपचार सुरू – 63