औरंगाबाद (वृत्तसंस्था) – कोरोना’ला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. तसेच यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकार आपापल्या पातळीवर उपयायोजना करत आहेत. तसेच गोरगरीबांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे.याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघात स्वस्त धान्य दुकानांना भेटी देत तेथील वितरणाच्या व्यवस्थेची पाहणी, आरोग्य यंत्रणाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना याचा आढावा घेतला. दानवे यांनी काल भोकरदन तालुक्यातील फत्तेपुर गावातील गोरगरिंबाना अन्नधान्य, किराणा सामान, फळांचे वाटप केले.यावेळी बोलताना दानवे म्हणाले, ‘कोरोना संकटात हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांचे हाल होत आहे. पण हीच गरिबांना मदत करण्याची खरी वेळ आहे, अन्नधान्यसह शक्य ती मदत करा आणि पुण्य पदारात पाडून घ्या असे आवाहन दानवे यांनी केले आहे.राज्यातील कोरोना रुग्णांची ४००० हजारांच्या पुढे गेली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.