चाळीसगाव (प्रतिनिधी) येथे दर वर्षाप्रमाणे रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे शनिवार दिनांक 7 मार्च व रविवार 8 मार्च 2020 रोजी विनामूल्य प्लास्टिक सर्जरी अँड हॅन्ड सर्जरी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
दरम्यान हा उपक्रम मागील 18 वर्षांपासून राबविण्यात येत आहे तरी या शिबिरात गरीब रुग्णांवर पुणे आणि मुंबई येथून आलेले नामांकित आणि तज्ञ डॉक्टर शस्त्रक्रिया करणार आहेत.या मध्ये फाटलेले ओठ तुटलेली बोटे जळाल्या मुळे चिकटलेली कातडी चेहऱ्यावरील गोंधण जखमेच्या खुणा इत्यादी प्रकारचे व्यंग असणाऱ्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया आणि नंतरच्या औषधोपचार मोफत करण्यात येणार आहे. अविवाहित मुली आणि स्त्री रुग्णांना प्राधान्य दिले जाणार आहे
याबाबत संपर्क
रोटे.बलदेव पुंशी मो.न.९८२२०५४९३९
व रोटे.संदीप देशमुख मो.न.८१४९३४३६२८ यांच्याशी संपर्क करावा शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी दुपारी तीन वाजता शस्त्रक्रियेसाठी पूर्व तपासणी व निवड करण्यात येणार आहे तपासणी फी पन्नास रुपये मात्र आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
नोंदणी चे ठिकाण
बलदेव पुंशी c/o मे.मन्साराम शितलदास, घाट रोड चाळीसगाव महावीर हॉस्पिटल,चाळीसगाव
बापजी हॉस्पिटल ,हिरापूर रोड साई कृष्ण हॉस्पिटल, लक्ष्मी नगर चाळीसगाव