नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – भारतात कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढत होताना दिसतेय. याच काळात राजधानी दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसच्या संशयीत रुग्णांने आत्महत्या केली आहे.दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात एक कोरोना संशयीत रुग्णाने आत्महत्या केली. रुग्णाने 7 व्या मजल्यावरुन उडी मारून आपले जीवन संपवले. 35 वर्षीय मृतक व्यक्ती ही ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधून परतली होती. गेल्या एक वर्षापासून ही व्यक्ती सिडनीमध्ये राहत होती.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाला रात्री 9 वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाहून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यात लक्षणं आढळून येण्यासोबतच डोकेदुखीचाही त्रास होता. हा रुग्ण सिडनीहून एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीत परतला होता. विमानतळावर आल्यानंतर त्याला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म देण्यात आला. यामध्ये आपल्याला डोकेदुखीचा त्रास असल्याचा उल्लेख केला होता.डॉक्टर जेव्हा या रुग्णाच्या रुममध्ये गेले. यावेळी तो बेडवर आढळला नाही. मात्र दुसऱ्या एका डॉक्टरला 9.15 वाजता इमारतीच्या खाली मृतदेह आढळला. या महिला डॉक्टरने तातडीने घटनेची माहिती दिली. मात्र तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाला होता.