मुंबई (वृत्तसंस्था) – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ४ एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. १ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेसंबधीची कारणं आयोगाकडून तपासली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर यावेळी शरद पवारांची साक्ष नोंदवली जाणार आहे.
दरम्यान, स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्यांमध्ये कोणतीही कटुता नव्हती. मात्र, आजुबाजूच्या खेड्यात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी फिरुन वेगळं वातावरण निर्माण केलं,” असं वक्तव्य पवार म्हणाले होते. त्यावरून पवारांना या दंगलीबद्दलची ही माहिती कोठून मिळाली. त्यांच्याकडे आणखी काय माहिती आहे? याबद्दल त्यांची तातडीनं साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी अॅड . प्रदीप गावडे यांनी केली होती.या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करणारे आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी याआधी शरद पवारांची साक्ष नोंदवली जाणार असल्याचं सांगितलं होतं. अॅड प्रदीप गावडे यांनी कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे केली होती. तसा अर्ज त्यांनी चौकशी आयोगाकडे केला होता. त्यानंतर आयोगाने शरद पवारांना चौकशीसाठी बोलवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांना समन्स बजावण्यात आले असून त्यांना ४ एप्रिल रोजी आयोगासमोर हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.