पाळीव कुत्रीचा मृत्यू, महाबळ रोडवरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – येथील महाबळ रोडवर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या शासकीय निवासस्थानी दुपारी वीज पडल्याने येथील पाळीव कुत्रीचा त्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
बुधवारी ९ जून रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांच्या महाबळ रोडवरील शासकीय निवासस्थानी घरावर वीज कोसळली आहे. यात तेथील जीनी नावाच्या ४ वर्षीय पाळीव कुत्रीचा त्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती डॉ.एन.एस.चव्हाण यांना त्यांच्या मुलीने दुपारी फोन करून दिली. तात्काळ चव्हाण हे घरी पोहोचले. त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी येऊन पुष्टी केली असून या घटनेला जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे महाबळ परिसरात वीज पडल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यावेळी परिसरातील विजदेखील गेलेली होती. थोडा पाऊस पडल्यामुळे ढगाळ वातावरण देखील होते. वीज पडल्यामुळे महाबळ सह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक चिंतीत झाले आहे.