मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वरून 63 वर गेली असून मुंबई 10 नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधित वाढत्या रुग्णांवर राजेश टोपेंनी जनतेला मोलाची सूचना केली आहे. देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधित वाढत्या रुग्णांवर राजेश टोपेंनी जनतेला मोलाची सूचना केली आहे. खासगी आणि शासकीय कार्यालयात एअर कंडिशन बंद करा. शासकीय कार्यालयात एसी वापरू नये जमल्यास कमीत कमी वापरावा त्यामुळे कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.राज्यात कोरोनानं 63 जण संक्रमित झाले आहेत. काल संख्या 52 होती आता ती थेट 63 झाली आहे. या नवीन रुग्णांत 10 मुंबईचे आहेत, एक पुण्याचा आहे. परदेशातून आलेले लोक 8 आहेत. तीन हे त्यांच्या संपर्कात आले असल्याची माहिती टोपेंनी दिली आहे. दरम्यान, काल पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टेस्टिंगची सुविधा वाढवून देण्याची मागणी केली आहे. तोच मुद्दा मी पवारसाहेबांना सांगितला होता, असंही राजेश टोपे म्हणाले.