जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून आज दुपारी आलेल्या जिल्हा कोविड रूग्णालयाने स्वब घेतलेल्या 48 जणांचे अहवाल प्राप्त झाले असुन यात 5 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 756 झाली असून आतापर्यंत ७७ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना पॉजिटिव्ह आढळले रुग्ण भुसावळ 3, जामनेर 1, अमळनेर 1 येथील आहे. एकुण 5 रुग्णांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.