शेंदुर्णी (प्रतिनिधी) – कोरोना पार्श्वभूमीवर नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी रस्त्यावर उतरून लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत कर्मचारी कलीम शेख, विलास जोहरे, राजकुमार बारी, मधुकर बारी, दिनेश कुमावत, सुनील निकम, सुनील मोची यांच्या पथकाने १ जून रोजी सकाळी शहरातील विविध अस्थापनांवर धडक कारवाई करत दंड वसुली केली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे, ग्राहकांची गर्दी, मास्कचा वापर न करणाऱ्यांवर ३ हजार १०० रूपयांचा दंड वसुल केला आहे. समाधान वडा पाव सेंटर, भागवत भोई याचे वडा पाव सेंटर यांच्या गाड्या सुरू असल्याचे निदर्शनास आले. सागर कलेक्शन, अशोक क्लॉथ, पी.सी.ज्वेलर्स येथे मास्कचा वापर न करणे या कारणाने प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारणी करण्यात आली. एकूण ६ हजार १०० दंड वसुली केली. या आधीही प्लास्टिक बंदी, मास्क न वापरणाऱ्यांकडून दंडाची वसुली करण्यात आली अवैधरित्या बाजार भरविल्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांकडूनही दंड वसूल करण्यात आला आहे.