पुणे (वृत्तसंस्था) –मंचर -पारगाव -शिंगवे (ता. आंबेगाव) येथील कारवस्ती येथे शेतीच्या बांधाच्या कारणावरुन पितापुत्रास मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मच्छिंद्र बबन दातखिळे, राहुल मच्छिंद्र दातखिळे, केतन मच्छिंद्रनाथ दातखिळे,पंढरीनाथ मारुती दातखिळे, नवनाथ विठ्ठल दातखिळे, रेवननाथ विठ्ठल दातखिळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर बाबाजी ढोबळे यांनी फिर्याद दिली आहे.