मुंबई (वृत्तसंस्था) – आजपासून (दि. 1) मुंबई आणि दिल्लीत विना अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 62 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे आता मुंबईत गॅस 714 रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीत 744 रुपयांना गॅस मिळणार. गॅसच्या किंमतीत कपात झाल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 65 रुपयांनी तर चेन्नईमध्ये 64.50 रुपयांनी कमी झाली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या प्रसाराच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून, घरोघरी गॅसचा पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत, काही दुर्दैवी घटना(मृत्यू) झाल्यास त्यांना मदत म्हणून 5 लाख रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा, सार्वजनिक क्षेत्रातील IOCL, BPCL आणि HPCL या तेल विपणन कंपन्यांनी केले आहे.