जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील भास्कर मार्केटमध्ये गॅरेज समोर उभ्या असलेल्या दुचाकीला अज्ञातांनी पेटवून दिल्याचा प्रकार आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडला. आग लागल्याचे पाहून नागरीक आणि जिल्हा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या मदतीने ही आग विझविली. विशेष म्हणजे घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर जिल्हापोलीस ठाणे आहे. याप्रकरणी अद्याप पोलीसांत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. मात्र ही आग लावणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहे.