पाळधी (प्रतिनिधी) – देशात कोरोनाची संसर्ग वाढतच आहे. यामुळे सर्व ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे कंपनी कारखाने इ. अश्या अनेक ठिकाणी परप्रांतीय मजुर आलेली असतातच अशा या भयावह परिस्थितीत लाॅकडाऊन असल्याने कामे बंद करण्यात आली तर परप्रांतीयांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. सुरत,राजस्थान,वडोदा,नवसारी,अशा अनेक शहरातून परप्रांतीय मजूर पायी चालत दरकोस दर मुक्काम करत एका जिल्ह्यातुन ते दुसऱ्या जिल्ह्यात जात आहे कोरोनामुळे सर्वांनाच एका वाहनातून अशक्य आहे कोणताही चालक त्यांना वाहनात घ्यायला तयार होत नाही त्यामुळे त्यांना पायी जाण्याशिवाय पर्याय राहीलेला नाही आहे अशा स्थितीत पाळधी शहरालगत जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरून दरोरज शेकडो परप्रांतीय आपले परिवारसह जात आहे. पाळधी येथील श्री संत भिमा भोई बहुउद्देशिय संस्था व सामाजिक कार्यकर्तेतर्फे या राष्ट्रीय महामार्ग क्र६.वरून पायी जाणार्या येणार्यानां मजूर लोकांना संस्था तर्फे शेवमुरमुर्यांचे पाकीटे,खिचडी,पोहे व थंड पाणी देण्यात येत आहे.अशी मोफत सेवा या संस्थांचे पदाधिकारींनी व सामाजिक कार्यकर्ते मिळून ४ ते ५ दिवसा पासून दररोज १०० ते २०० लोकांना मोफत सेवा करण्यात येत आहे याठीकाणी सहभागी भिमराव भोई,धनराज भोई,मुकेश भोई,राहुल शिरोडे,प्रसाद ठाकुर,अशोक कोळी, कमलेश भोई,प्रवीण भोई ,उत्तम भोई,गजानन भोई,प्रशांत भोई अशाप्रकारे ही मोफत सेवा स्वखर्चाने पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते राबवत आहे या कार्यामुळे परप्रांतीय मजूर लोकं यांचा भावना अश्रुअनावर होत आहेत व आभार व्यक्त करून आपल्या गावाकडे पायी चालत वाट धरत आहे.