जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनामुळे देशभरात २१ दिवसाचा लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागात हातमजुरी करणारे ,गोरगरीब, निराधार,अपंग,विधवा भगिनी ,शेतमजूर यांना काम नसल्याने त्यांना दोन वेळचे जेवण सुद्धा मिळत नाहीय. म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीत भोजन कक्ष सुरू करा,अशा मागणीचे पत्र मनसेचे जिल्हा सचिव अॅड.जमील देशपांडे यांनी ई-मेलद्वारे जिल्हाधिकारी यांना पाठवले आहे.
मनसेचे जिल्हा सचिव अॅड.जमील देशपांडे यांनी ई-मेलद्वारे जिल्हाधिकारी यांना पाठवलेले पत्रात म्हटलेय की, शहरी भागात खूप सामाजिक संस्था आहेत, शिवभोजन थाळी (जिल्हास्थळी) उपलब्ध आहे.त्यामुळे मोठ्या शहरातील हातमजूर,निराधार यांना काही प्रमाणात निश्चितच मदत मिळत आहे.मात्र गावातील(ग्रामीण भागातील) परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे ग्रामीण स्तरावरील सर्व अंगणवाड्यात गरजूंना दोन वेळ भोजन उपलब्ध करून द्यावे. सदर काम ग्रामसेवक,तलाठी, अंगणवाडी सेविका यांच्या देखरेखेखाली गावातीलच बचत गटांना द्यावे, अशी विनंती देखील या पत्रात केली आहे.