एरंडोल (प्रतिनिधी) – ३१ मार्च रोजी एरंडोल मनपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश सिंग परदेसी मुख्याधिकारी किरण देशमुख व मनपा कार्यालय अधीक्षक संजय ढमाल यांनी शहरात फिरून भाजीपाला विक्रेते व फळविक्रेते यांच्या बैठक व्यवस्थेविषयी आढावा घेतला, सर्व विक्रेत्यांनी या योजनेला उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे असे प्रतिपादन न.पा. अध्यक्ष रमेश सिंग परदेशी यांनी यावेळी केले. यावेळी मुख्याधिकारी किरण देशमुख व कार्यालय अधीक्षक संजय ढमाल हे उपस्थित होते. सोशल डिस्टन्सीग चे व्यवस्थित पालन होत असल्याचे यावेळी आढळून आले. दरम्यान न.पा.तर्फे मंगळवारी न.पा. कार्यालय जवळ धरणगाव चौफुलीवर ,अमळनेर दरवाजा परिसरात व मस्हावद नाका परिसरात या मोक्याच्या ठिकाणी जनजागृतीपर फलक लावले.