जळगाव (प्रतिनिधी) – आज जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने एन एस यु आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली खासदार राहुल जी गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील गोरगरीब गरजवंतांना मदत म्हणून नाही तर कर्तव्य समजून अन्नदानाचे व न्याय किटचे वाटप करण्यात आले .


खासदार राहुल गांधी यांनी देशातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, देशावरती कोरणा-या आजाराचे महासंकट असल्यामुळे व दोन दिवसांपूर्वी भारत देशाचे वीर जवान शहीद झाल्यामुळे वाढदिवसाचा कुठेही जल्लोष किंवा गाजावाजा न करता तसेच बॅनरबाजी व जाहिरातबाजी वरील वायफळ खर्च कोरोना मधील गोरगरीब गरजवंतांना अन्नदानाचे व न्याय वाटप तसेच कोवीड योद्धांचा म्हणजेच पोलीस कर्मचारी,डॉक्टर, नर्से, सफाई कामगार, पत्रकार की ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशातील व राज्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे व मदतीचे कार्य केले अशा सर्व लोकांचा सन्मान करणे, तसेच मनरेगा मध्ये जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळवून द्यावा यासारख्या देश हिताच्या गोष्टींवर ती खर्च करावा अशा प्रकारचे आव्हान राहुल गांधी यांनी केले होते.
त्यालाच अनुसरून जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील रेल्वेस्थानकाजवळ 200 गोरगरीब गरजवंतांना अन्नदान व न्याय किट वाटप करून सहकार्य करण्याचा प्रयत्न केला.
याप्रसंगी एन एस यु आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अनुसूचित जाती जमाती विभाग अध्यक्ष मनोज सोनवणे, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, रेशनिंग कमिटीचे अध्यक्ष वासुदेव महाजन ,मनोज चौधरी, उद्धव वाणी,प्रल्हाद सोनवणे, जमील शेख, योगिता शुक्ला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







