नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारत-नेपाळ सीमेवर लिपुलेख आणि कालापानीवर चालू असलेल्या वादादरम्यान उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यातील धारचूला ते लिपुलेखपर्यंत भारताने 80 किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे, ज्यामुळे कैलास मानसरोवरचा प्रवास जो की आधी 21 दिवसांत पूर्ण होत होता तो आता अवघ्या एक दिवसात पूर्ण होईल. या रस्त्याच्या बांधकामामुळे स्थानिकांमध्ये उत्साह आणि आनंद असला तरी शेजारचे देश या बांधकामामुळे खूश नाहीत. त्यांच्या नाराजीचे एक कारण असे आहे की या मार्गाद्वारे भारतीय सैन्याची हालचाल करणे खूप सोपे होईल.
भारत आणि नेपाळ सीमादरम्यान सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पिथौरागडमधील धारचूला ते लिपुलेखपर्यंत भारताने रस्ता तयार केला आहे. गेल्या महिन्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या रस्त्याचे उद्घाटन केले, त्यानंतर हा रस्ता पक्का करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या रस्त्याच्या बांधकामामुळे दोन गोष्टी अतिशय सुलभ होतील. पहिली म्हणजे सीमेला लागून असलेल्या खेड्यांमधील लोकांना ये-जा करणे सोयीस्कर होईल, दुसरी म्हणजे सैन्याला सीमेवर येण्यासाठी सोपे होईल. या रस्ता बांधणीमुळे स्थानिक लोकही खुश आहेत कारण त्यांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यामुळे त्यांना व्यवसाय करणे सुकर होईल.
तसेच नेपाळ हा ज्या प्रकारे लिपुलेख व कालापानी यांच्यावर आपला अधिकार असल्याचे सांगत आहे ते खरोखरच आश्चर्यकारक आहे, कारण 1816 च्या सुगौली कराराच्या वेळी काली नदीला सीमा रेखा मानले गेले होते, त्यानंतर याबद्दल आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये कोणताही सीमा वाद झाला नव्हता. पण चीनच्या चिथावणी देण्यावरून नेपाळने आपल्या नकाशामध्ये भारतीय भूभागात येणाऱ्या बर्याच ठिकाणी आपला ताबा आणि आपली जमीन असण्याविषयी बोलण्यास सुरवात केली आहे. हा रस्ता चीनच्या या चिथावणीखोरपणा मागील मुख्य कारण मानला जात आहे, कारण भारतात हा रस्ता बनल्याने चीन खूप निराश आहे. हेच कारण आहे की नेपाळला चिथावणी देऊन चीन भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.