नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांची शुक्रवारी सकाळी प्रकृती बिघडली आहे. न्यूमोनिया आणि फुफ्फुसाचा संसर्ग खूप वाढला आहे. ऑक्सिजनची पातळी देखील ८८-८९ वर पोहोचली आहे. त्यांना आता संपूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर ठेवले आहे. त्यांना अगोदरही ऑक्सिजन सपोर्ट दिला जात होता, पण काहीवेळा ऑक्सिजन सपोर्ट काढला देखील जात होता.
दिल्लीच्या आरोग्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली की, सत्येंद्र जैन यांना फुफ्फुसाचा संसर्ग वाढल्यानंतर ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. सध्या सत्येंद्र जैन रुग्णालयात असल्याने दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयातील कामकाज उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सांभाळत आहेत.