भोपाळ (वृत्तसंस्था) – देशातील ८ राज्यांमधील १९ जागांवर राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. मध्य प्रदेशातही आज तीन जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी एक खास दृश्य पाहायला मिळाले. कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळून आलेले कॉंग्रेसचे आमदार मतदान करण्यासाठी पीपीई किट घालून दाखल झाले.
शुक्रवार सकाळपासूनच कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करत आहेत. परंतु दुपारी एक वाजेच्या सुमारास कॉंग्रेसचे आमदार कुणाल चौधरी मतदान करण्यासाठी पीपीई किट घालून विधानसभा भवनात पोहोचले. कोरोना व्हायरस चाचणीत काही दिवसांपूर्वी ते पॉझिटीव्ह आढळले होते.
कोरोना संक्रमित असलेल्या किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या कोणत्याही व्यक्तीने सुरक्षित राहायचे आहे आणि स्वत:ला आयसोलेट करायचे आहे. परंतु मतदानामुळे सर्व सावधगिरी बाळगून आमदार येथे दाखल झाले.
जेव्हा मतदान करून आमदार परत गेले तेव्हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला गेला. मतदानाची जागा आणि संपूर्ण मुख्य गेट स्वच्छ केले गेले, जेणेकरून दुसर्या कोणालाही धोका होऊ नये.