नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – द्वारकामधील जगप्रसिद्ध कथावाचक मोरारी बापू हे सध्या चर्चेत असून भगवान श्रीकृष्णाचे मोठे भाऊ बलराम हे मद्यपी होते. तसेच कृष्णाचे द्वारकामधील राज्य फेल होते असे त्यांनी म्हटले होते. या वक्तव्यानंतर कृष्णभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली होती. मोरारी बापूंच्या वक्तव्याचा सर्वस्तरांतून विरोध झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे.

काल मोरारी बापूंवर एका भाजपच्या माजी आमदाराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. माजी आमदार पबुभा माणेक हे मोरारी बापू यांच्या एका वक्तव्यावर नाराज होते. त्यावरुन त्यांनी मोरारी बापूंवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मोरारी बापू आणि माणेक समोरसमोर आल्यावर हा प्रकार घडला. यावेळी खासदार पूनम माडम यांनी मध्यस्थी केल्याने हे प्रकरणं निवळले आहे. काही दिवसांपूर्वी मोरारी बापू यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे मोठे भाऊ बलराम हे मद्यपी होते आणि कृष्णाचे द्वारकामधील राज्य फेल असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यानंतर काल ते द्वारकामध्ये माफी मागण्यासाठी आले होते. द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाच्या विरोधी वक्तव्य कथाकार मोरारी बापू यांना महागात पडले. माफी मागायला आलेल्या मोरारी बापू यांच्या समोर भाजपचे माजी आमदार पबुभा माणेक आले त्यावेळी त्यांनी मोरारी बापूंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.







