मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात 328 नवीन रुग्ण आढळले आणि राज्यातील करोनाबधित रुग्णांची संख्या 3,648 वर पोहोचली. आजच्या नवीन 328 रुग्णांपैकी मुंबईत 184 आणि पुण्यात 78 नवीन रुग्ण आढळले आहेत, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ठाणे शहरात सहा, भिवंडीमध्ये 3, ठाणे जिल्ह्यात 3, रायगडमध्ये 5, मीरा भाईंदरमध्ये 11, कल्याण डोंबिवलीत 5, पालघरमध्ये 7, पिंपरी चिंचवडमध्ये 8, नागपुरात 3, नवी मुंबईत 2, सातारामध्ये 4, अकोला, अमरावती, नंदुरबार, पनवेल, औरंगाबाद, वसई विरार आणि पुणे जिल्ह्यात प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.