नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्याच्याशी सामना करण्यासाठी सर्व देश एकत्रपणे लढा देत आहेत. तर दुसरीकडे सीमेवरून पाकिस्तान आपल्या नापाक कृत्य करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. कारण जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरा येथे सैन्य आणि अतिरेकी यांच्यात चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. सैनिकांनी अवंतीपोरा भागाला वेढा घातला आहे. तसेच, चकमकीबद्दल कोणतीही अफवा पसरली जाऊ नये म्हणून या भागात इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आ
अवंतीपोरा भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे लष्कराच्या 50 आरआर, एसओजी आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने या भागाला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी स्वत:ला वेढलेले पाहून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी अतिरेक्यांना शरण जाण्यास सांगितले. असे असूनही दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू ठेवला. त्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने मोर्चा काढला.
अनेक तास चाललेल्या चकमकीत दहशतवाद्याला ठार करण्यात त्यात यश आले आहे. सध्या दहशतवाद्यांचा गोळीबार थांबविण्यात आला आहे. परंतु सुरक्षा दलांनी दक्षतापूर्वक आघाडी ठेवली आहे. या चकमकीविषयी जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी माहिती दिली. ‘अवंतीपोरा पोलिस आणि सैन्याने काल रात्री ही कारवाई सुरू केली होती. दहशतवादी ज्या भागात लपून बसले होते ते एका मशिदीला लागूनच आहे. दहशतवाद्यांनी गोळीबाराच्या आश्रयाने मशिदीत प्रवेश केला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.