जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातुन पंढरपुर येथे जाणाऱ्या भाविकांना कळविण्यात येते की, सद्यस्थितीमध्ये पंढरपुर येथील ‘विठ्ठल रुक्मिणी मंदीर’ हे आषाढी एकादशीपर्यंत बंद ठेवण्यात आलेले आहे.

त्यामुळे जळगाव जिल्ह्यातुन पंढरपुर येथे जाणाऱ्या भाविकांनी ई- पाससाठी (प्रवास पास) या कार्यालयाकडे अर्ज करु नयेत. असे आवाहन रविंद्र भारदे, नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.







