आयपीएस अधिकारी निलाभ रोहन यांची कारवाई
जळगाव – मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर जळगाव शहरातील खेडी गावा जवळ ज्ञानचंद्र अपार्टमेंट वर आयपीएस सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांच्या पथकाने छापा टाकला. या इमारतीत हाय प्रोफाईल कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील खेडी खुर्द गावाजवळ ज्ञानचंद्र अपार्टमेंट याठिकाणी हाय प्रोफाईल कुंटणखाना चालवला जात असल्याची गुप्तमाहिती आयपीएस सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांना मिळाली होती. त्यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहम, एमआयडीसी पोलीस निरीक्षक विनायक लोकरे व गुन्हे शाखेचे पथक, एमआयडीसी पोलीस कर्मचारी अशा संयुक्त पथकाने आज रात्री आठ वाजेच्या सुमारास ज्ञानचंद्र अपार्टमेंट वर छापा टाकला. याठिकाणी आंबट शौकीनाकडून कुंटणखाना चालवत असल्याचे पोलीस पथकाला निदर्शनास आले आहे.
पँटर्न इशारा देताच मिळालेल्या गुप्त माहितीचा पाठलाग करत पोलीस पथकाने ज्ञानचंद्र अपार्टमेंटमध्ये कारवाई करण्यापूर्वी नियोजित कंटाळला संबंधित दलाला फोन करायला लावले. सौदा ठरल्यावर पैसे दिल्यानंतर पंटर रूममध्ये जाताच त्याने मिस कॉल देत पोलिसांना सिग्नल दिला. काही वेळातच पोलिसांचा ताफा अपार्टमेंटमध्ये शिरला. चार महिलांसह एक पुरुष दलाल पोलिसांनी अटक केली असून रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.