मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाने सगळ्यांनाच आपल्या विळख्यात ओढलं आहे. बॉलिवूड अभिनेता सत्यजीत दुबे यांच्या आईला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून अभिनेत्याने स्वतः माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. आपल्या आईसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे.

सत्यजीत दुबे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आईसोबतचा फोटो पोस्ट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून माझी आई, माझी बहिण आणि मी कठीण प्रसंगाला सामोरं जात आहोत. काही दिवसांपासून माझ्या आईची तब्बेत ठीक नाही. तिला मायग्रेनचा त्रास आहे. ताप आल्यामुळे अंग दुखत होतं.







