मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसचा कहर दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्रात उद्यापासून चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरूवात होणार आहे. लॉकडाऊनमुळे सर्व मालिकांचे चित्रीकरण थांबले आहे. परिणामी बेरोजगारी वाट्याला आल्यामुळे टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवालने या जगाचा निरोप घेतला आहे. तो ३२ वर्षांचा होता. शुक्रवारी रात्री नवी मुंबईतील राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला.
या ३२ वर्षीय अभिनेत्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. मनमीतने गळफास घेतल्याचे लक्षात येताच त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांकडे मदत मागितली परंतु कोरोनाच्या संशयामुळे शेजारच्यांनी देखील मदत करण्यास टाळाटाळ केली.