पहुर (प्रतिनिधी) – दिनांक 12 जून 2020 रोजी रात्री 8 : 30 चे सुमारास मांडवा खुर्द ते तोंडापूर ता जामनेर रोडवर बाळू वाणी यांचे शेताजवळ तीन अनोळखी इसम यांनी विजय शांताराम गवळी राहणार तोंडापूर यांच्या गाडीला धक्का मारून खाली पाडून फिर्यादीस मारहाण करून त्यांच्याजवळील रोख रक्कम 8080 रुपये व मोबाइल असा एकूण 14 हजार रुपये चा माल जबरी चोरून नेल यावरून पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली सदर गुन्ह्याची माहिती माननीय पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, पहुर व उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकाडे त्यांचा सूचना व मार्गदर्शन प्रमाणे आरोपी त्यांचा शोध घेणे करिता घटनास्थळी रवाना होऊन आरोपींविरुद्ध प्राथमिक माहिती प्राप्त करून अज्ञात आरोपी हे जवळपासच्या गावाचे असावे असा अंदाज काढून घटनास्थळाचे जवळपास च्या पाच ते सहा गावावर लक्ष केंद्रित करून एक अधिकारी व तीन कर्मचारी अशी टीम तयार करून आरोपी त्यांचे शोधा करिता पाठवली असता काही गुप्त माहिती द्वारे गुन्ह्यातील गाडीचा नंबर प्राप्त करून दोन आरोपी यांना वाकडी येथून ताब्यात घेतले त्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे अजून तीन साथीदार निष्पन्न करून एकूण पाच आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन गाड्या व चोरलेला मुद्देमाल गुन्ह्याचे कामे जप्त करीत आहोत सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे पोलीस हवालदार शशिकांत पाटील पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर ठाकरे यांनी अथक मेहनत घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणला आहे.








