मुंबई (वृत्तसंस्था) – पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ‘ससून’ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याकडून बुधवारी सायंकाळी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याचा सहसंचालक पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. ‘ससून’ रुग्णालयात ‘करोना’च्या रुग्णांचा मृत्यूदर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात असल्याचेही बोलले जात आहे. पुण्यात कोरोना विषाणूंचा उद्रेक सुरू असतानाच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीच्या अनुशंगाने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाची उपाययोजनेचे अधिकार विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना दिले, कोरोनाच्या रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत असतानाच डॉ. चंदनवाले यांच्या बदलीचा फतवा सरकारने काढला. त्यांच्याकडे मुंबईमधील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या सहसंचालक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला असल्याचे आदेश गुरुवारी संध्याकाळी काढण्यात आला. या आदेशाची तातडीने अंमलबजाणी करावी, असेही पत्रात म्हटले आहे.







