• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यात 198 जणांचे कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना चाचणीसाठी 52 हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले असून आतापर्यंत 48 हजार 198 जणांचे कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर 2916 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी सुमारे 60 ते 70 टक्के जणांना लक्षणे दिसत नसून 25 टक्के जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत तर 5 टक्के पेक्षाही कमी रुग्णांची स्थिती गंभीर आहे. असे असले तरी कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्याचे प्रमाणही वाढत आहे. रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद, आरोग्य यंत्रणेचे परिश्रम यामुळे आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी सुमारे 295 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या या रुग्णांना दवाखान्यातून घरी सोडताना ठिकठिकाणी टाळ्यांच्या गजरात निरोप दिला जात असून समाजातूनही या रुग्णांचे स्वागत केले जात आहे. मंगळवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगतानाच कोरोनाबरोबरचे युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये 6 महिन्याच्या चिमुकल्यापासून ते 83 वर्षांच्या आजीबाईंचा समावेश असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. कोरोनाला हरविणाऱ्या सहा महिन्याच्या कल्याण येथील चिमुकल्याच्या आईशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्याचे अभिनंदनही केले. 9 मार्चला राज्यातील पहिले दोन कोरोना रुग्ण आढळून आले. पुण्यातील दाम्पत्य असलेले हे रुग्ण 14 दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर 23 मार्चला बरे होऊन घरी गेले. राज्यातील पहिले कोरोनामुक्त रुग्ण म्हणूनही त्यांचा उल्लेख केला पाहिजे. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणा परिश्रम घेत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. बरे होऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील 166, ठाणे मनपा 6, ठाणे ग्रामीण 3, कल्याण डोंबिवली 14, मीरा भाईंदर 2, नवी मुंबई 9, पनवेल 3, उल्हासनगर 1, वसई विरार 2, नागपूर 11, पुणे महापालिका परिसर 27, पिंपरी चिंचवड 12, पुणे ग्रामीण 4, अहमदनगर ग्रामीण 1, अहमदनगर महापालिका क्षेत्र 2, नाशिक ग्रामीण 1, रत्नागिरी 1, सिंधुदुर्ग 1, सांगली 25, सातारा 1, यवतमाळ 3 आणि गोंदिया 1 असे एकूण 295 रुग्णांचा समावेश असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून कोरोना रुग्ण बरे होऊन घरी जाताना त्यांच्या चेहऱ्यावर युद्ध जिंकल्याची भावना दिसून येत असून ठिकठिकाणी या रुग्णांना घरी जाताना टाळ्यांच्या गजरात आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी निरोप देताना दिसत आहेत. कल्याणमधील सहा महिन्यांचा चिमुकल्याला रुग्णालयातून जेव्हा घरी आणले तेव्हा तो राहत असलेल्या संपूर्ण सोसायटीच्या सदस्यांनी गॅलरीत उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. अशा कृतीमुळे समाजातही सकारात्मक संदेश दिला जात असून त्यामुळे उपचार करणारे आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि कोरोना बाधित रुग्ण, त्यांचे कुटुंबीय यांना मानसिक आधार आणि दिलासा मिळत आहे.


 

 

Previous Post

खोट्या बातम्या व्हॉट्सअप किंवा अन्य समाज माध्यमांवर पसरवू नयेत

Next Post

डॉ. दीपक म्हैसेकर यांचाकडे ससून रुग्णालयाची उपाययोजनेचे अधिकार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ. दीपक म्हैसेकर यांचाकडे ससून रुग्णालयाची उपाययोजनेचे अधिकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट
1xbet russia

पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट

February 27, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
जैन कंपनी

कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon