नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू केला आहे. अशातच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल कुमारस्वामीचा विवाहसोहळा पार पडला. मात्र, आता या लग्नसोहळ्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
निखिलचे लग्न कर्नाटकमधील काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री एम कृष्णप्पा यांची नात रेवती हिच्याबरोबर झाला आहे. यावेळी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा देखील उपस्थित होते. निखिल आणि रेवतीचा विवाहसोहळा रामनगरमधील एका फार्महाऊसवर पार पडला. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्यासाठी केवळ ३०-४० गाड्यांना परवानगी देण्यात आली होती. या सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी घेतल्याचा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. मात्र सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. तसेच मास्कचा वापरही कोणी केलेला दिसला नाही. दरम्यान, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन न केल्यास योग्य कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटक सरकारमधील अधिकाऱ्यांच्या दिली आहे.