मुंबई (वृत्तसंस्था) – तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्यावर ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. मौलाना साद यांच्यासहीत एकूण नऊ जणांची चौकशी आता ईडीकडून केली जाणार आहे.दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमध्ये झालेल्या तबलिगीच्या कार्यक्रमाला गेलेल्या हजारो लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी वापरण्यात आलेला निधी कुठून आला याची सुद्धा ईडीकडून चौकशी केली जाणार आहेत. तसेच त्यांना तबलिगी समाजाला दिला जाणारा फंट कुठून आला याची उत्तरे द्यावी लागणार आहे. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात विदेशातून अनेक नागरिक आले होते. त्यांच्या प्रवासाची आणि इतर सोयीची सुविधा कुणामार्फत केल्या गेली त्यासाठी पैसे कुठून आणले या प्रश्नांचे उत्तर मौलाना साद यांना द्यावे लागणार आहे. याआधीच मौलाना साद यांच्यावर दिल्ली पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि आता यानंतर ईडीने कारवाई सुरू केल्याने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.