धुळे – देशात लॉक डाऊन चा चौथा टप्प्याला सुरवात झाली आहे.देवपूरातील पांडव नगरात बंद घरात प्रवेश करुन 2ते 3 तोळे सोन्याची चोरी करून पसार झाले.
याबाबत मिळालेली माहिती की, लॉक डाऊन परिस्थिती सुरु असताना हि चोरटे मात्र संधीचे सोने करताना दिसत आहेत.
शहरातील देवपूर परिसरातील पांडव नगरात प्लॉट नंबर 4 मध्ये पाटील वाड्यात राहणारे रविंद्र शिंदे राहतात हे लॉक डाऊन परिस्थिती सुरु असल्याने परगावी अडकले होते.याच दरम्यान बंद घराचा चोरट्यांनी फायदा घेत घराचा दाराचा कडी कोयंडा तोंडुन चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील लाकडी, लोखंडी कपाट फोडून कपाटातील साहित्य जमिनीवर फेकून दिले.कपाटातील 2 ते 3 तोळे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत दिड ते दोन लाख रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला.हि बाब सोमवारी उघडकीस आली.चोरी बाबत देवपूर पोलीसांना माहिती देण्यात आली.पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील पहाणी केली.अधिक तपास कामी देवपूर पोलिसांनी फिंगरप्रिंट तज्ञ व श्वान पथकाची मदत घेतली.श्वान ने महामार्ग पर्यत माग काढला तो तिथेच घुटमळत राहिला.
देवपूर पोलीसांत उशिरापर्यंत चोरीच्या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.