पुणे (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसमुळे जगभर चिंतेचे वातावरण आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणांकडून दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे.
पुणे विमातळावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येत आहे. विमान पोहोचण्यापूर्वी प्रवाशांना एक फॉर्म भरण्यास सांगितला जातो. प्रवाशाचे पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक अशी माहिती भरून घेण्यात येते.
तसेच या फॉर्ममध्ये सर्दी, ताप, श्वास घेण्यास त्रास अशी काही लक्षणे आहेत का? याची माहिती भरण्यास सांगितली जाते. त्यानुसार प्रवासी माहिती भरून फॉर्म बाहेर पडणाऱ्या गेटमधून जाताना डॉक्टरांकडे जमा करतो. इन्फ्रारेड थर्मामीटरने व्यक्तीचे तापमान मोजले जाते. जे तापमान मोजले जाईल, त्याची नोंद फॉर्मवर केली जाते.