नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगभरात या विषाणूचे २० लाखाहून अधिक रुग्ण आहेत. तर, या विषाणूमुळे आतापर्यंत २७ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे ४ लाख ८६ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. मागील २४ तासात अमेरिकेत २ हजार ६०० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अमेरिकेत २५ हजारांपेक्षा जास्त जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे.गुरुवारी स्पेनमध्ये ५५१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, स्पेनमध्ये आतापर्यंत १९ हजार जणांचा कोरोना विषाणूने मृत्यू झाला आहे. या बाबत एएफपी या वृतसंस्थने वृत्त दिले आहे.