ग्वाटेमाला (वृत्तसंस्था) – अमेरिकन सरकार विदेशी नागरिकांना मायदेशी घालवून देण्याच्या प्रयत्नांत आहे. तथापी त्यांच्यामुळेच आमच्या देशातील करोनाचे संकट गंभीर बनत चालले आहे असा आरोप ग्वाटेमाला देशाने केला आहे. त्या देशाचे आरोग्य मंत्री हुगो मोनरॉय यांनी म्हटले आहे की, अमेरिकेहून ग्वाटेमालात आलेल्या विमानातील 75 टक्के प्रवासी करोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्या आधी अमेरिकेहून त्या देशात आलेले केवळ तीन जण करोनाग्रस्त होते. या घटनेनंतर ग्वाटेमालाचे अध्यक्ष जिआमत्तेई यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले; पण त्यात त्यांनी अमेरिकेतून घालवून देण्यात आलेल्या निर्वासितांच्या करोना स्थिती विषयी कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र अमेरिकेमुळेच आमच्या देशात करोनाचा फैलाव झाला आहे असा स्पष्ट आरोप केला आहे.