धुळे – कुमार नगर भागात झालेल्या पोलीसांच्या धडक कारवाई मुळे शहरात खळबळ उडाली.अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरु असताना शहरात सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत व्यवहार करण्यास काही दुकानदारांना दुकान सुरू ठेऊन खरेदी विक्री व्यवहाराच्या वेळेत सुट देण्यात आली आहे.काही व्यापारी वर्ग लॉक डाऊन आदेशाला केराची टोपली दाखवत मनमानी पद्धतीने व्यवहार सुरू ठेवत आहे.शहरात सगळ्याच भागात हेच चित्र दिसत असल्याने शहरात व्यापारी वर्गात हि संभ्रमाचे वातावरण आहे.
याच दरम्यान शहरातील साक्री रोड परिसरातील कुमार नगरात लॉक डाऊन वेळ संपल्यावर हि एका व्यापाऱ्यांने एका घरातच होलसेल किरणा दुकान सुरू केले आहे.या दुकानातून विदेशी सिगार विक्री सुरू आहे.अशी माहिती एका खबरी ने जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना दिली.
त्यांना माहिती मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.तातडीने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या गाडी चा ताफा घटनास्थळी दाखल झाला.दुकानातून व्यापारी हा सिगरेट,बिडी बंडल विक्री करत असताना अधिकारी यांनी छापा टाकला.व व्यापाराला नियमांचे उल्लंघन करताना रंगेहाथ पकडले.त्याने तेथील पाच ठिकाणी वेगवेगळ्या जागेत, घरातील अंगणातील पोर्च मध्ये साठा करून ठेवलेला माल लॉक डाऊन मध्ये जादा दराने विक्री करून स्वत:चे फायदा करुन घेण्यासाठी जादा दराने माल विक्री करताना पोलिसांनी हि कारवाई केली.मनपा आरोग्य विभाग अधिकारी व कर्मचारी यांची मदत घेण्यात आली.
परिसरात पाच वेगवेगळ्या ठिकाणी साठा करून ठेवलेला विदेशी सिगरेट,बिडी एक बंडल,गुटखा,असा माल एकुण सहा मिनी टेम्पो त भरुन शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे.आवारात एकुण जप्त केलेल्या मालाची मोजणी करून वेगवेगळे करण्याचे कामात कर्मचारी व्यस्त होते.
होलसेल सुपारी विक्री करणारा व्यापारी यांचेकडे छापा टाकून पोलीसांनी हि कारवाई केली आहे. जप्त केलेल्या मालाची किंमत वीस लाख रुपये आहे. शहर पोलीस ठाण्यात याबाबत उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.