जळगाव (प्रतिनिधी)- मुंबई येथे राहणार्या रिक्षा चालकाचा परिवार हा उत्तर प्रदेशातील जोनपुर जिल्ह्याकडे निघाला होता. मात्र त्या रिक्षा चालकाच्या पत्नीला कावीळ झाल्याने तिचा आज जळगावातील खेडी पेट्रोल पंपाजवळ मृत्यू झाला. तिला केवळ सहा महिन्याची मुलगी असून त्या मुलीला मयताच्या नातेवाईकांसोबत पुढे मार्गस्थ करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनायक लोकरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, पोहेकॉ सचिन मुंढे, पो.कॉ. किशोर बडगुजर आदींनी मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात आणला, यावेळी सीएमओ डॉ. दिपक जाधव यांनी मृत घोषीत केले. तिचा कावीळ आजाराने मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. मयताचे नाव सुधा संतोष मिश्रा (वय-22) असे असून तिचे पती रिक्षाचालक संतोष मिश्रा हे मुंबईतील एरोली भागात रिक्षा व्यवसाय करीत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे परतिच्या गावाकडे निघाले असता वाटेत त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. मात्र पोलिसांनी तातडीने मदत कार्य करीत रात्री उशिरापर्यंत पती संतोष मिश्रा यांच्यासह त्यांचा पत्नीचा मृतदेह रवाना करण्याची सोय केली. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.