धुळे – देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरु असताना हि इंडिका गाडीतून विदेशी मद्य साठा सह चार जणांना सोनगीर पोलीसांनी ताब्यात घेतले.
याबाबत मिळालेली माहिती की, देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरु असताना हि एका इंडिका गाडीतून विदेशी मद्य साठा वाहतूक करुन धुळ्याकडे नेण्यात येत असल्याची माहिती सपोनि प्रकाश पाटील यांना खबरी मार्फत मिळाली.त्या आधारे पोलीसांचे एक पथक तयार करून मुंबई आग्रा महामार्गावरील सरवड फाट्या जवळ बेरीकेटींग लावून पोलीसांनी बुधवारी सायंकाळी सहा ते सात वाजे दरम्यान वाहन तपासणी सुरू केली.
याच दरम्यान दोंडाईचा मार्गाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मुंबई-आग्रा महामार्गाहुन धुळे कडे जाणारी एक पांढऱ्या रंगाची इंडिको मांझा गाडी क्रं.एम एच 20 ही एच 9335 माता हिंगलाज टि व्ही असा लोगोचा स्टिकर व गाडीच्या नंबर प्लेटवर संपादक लिहिलेले गाडीत चार जण धुळे शहरातील रहिवाशी बसून डिक्कीत विना परवाना देशी विदेशी मद्य साठा वाहतूक करताना सोनगीर पोलीसांनी कारवाई करुन चौघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
जप्त केलेला मुद्देमाल
50,172 त्यात 36,000 हजार रुपयांची मॅकडॉल नं.1च्या 240 बाटल्या.
7200 च्या 12 बाटल्या मॅकडॉल नं.1,देशी दारूच्या बाटल्या,बियरच्या बाटल्या.
इंडिको गाडी किंमत 2,00,000 रुपये.
चार जणांची नावे.
राजेश सुभाष अग्रवाल.वय.31. रा.मनमाड जीन काझी प्लॉट पाण्याच्या टाकीजवळ.धुळे.
देवेंद्र दत्तात्रय सोनार ( वडनेरे ) वय.51.रा.सुभाष नगर गल्ली.14.सुर्यमुखी मारूती मंदिराजवळ जुने धुळे.
चंद्रकांत भिका चौधरी .वय.45.रा.विटाभट्टी दुर्गादेवी माता मंदिर जवळ देवपूर धुळे.
सतिष नेमिचंद सोनपूरे (मराठे) वय.35.रा.ह.म.जगदिश नगर साक्री रोड धुळे.
यांचेकडून एकुण मुद्देमाल 2,50,172 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
सोनगीर पोलीसांत अवैधरित्या मद्यसाठा वाहतूक करताना आढळून आल्या प्रकरणी पो.ना.शिरीष नाईक यांनी फिर्याद दाखल केली आहे.चौघांन विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ,उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे मार्गदर्शनाने सोनगीर सपोनि प्रकाश पाटील,पो.ना.संदेशसिंग चव्हाण,अतूल निकम, आदींनी हि कामगीरी केली आहे.