पाचोरा( प्रतिनिधी )
जिल्ह्यासह महाराष्ट्रात कर्तुत्वाचा ठसा उमटवणारे सहकार महर्षी व समाजवादी नेते माजी आमदार कै. अप्पासो.ओंकार नारायण वाघ यांना त्यांच्या 88 व्या स्मृतिदिनानिमित्त बांबरुड राणीचे येथील राम मनोहर लोहिया विद्यालयातील त्यांच्या शक्ती स्थळावर कौटुंबिक वातावरणात भावपुर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, पाचोरा न. प. चे गटनेते संजय वाघ ,बांबरुड राणीचे सरपंच मधुकर वाघ यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा आदरांजली सोहळा सोशल डिस्टन्सिंग पाळत मोजक्या आप्तेष्ट आणि कार्यकर्ता परिवाराचे उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी अण्णासो दगाजी राव वाघ, पंचायत समिती सदस्य ललीत वाघ,नगरसेवक भूषण वाघ,मुख्याध्यापक बि.डी. बोरुडे,पर्यवेक्षक डी व्ही पाटील,संजय सूर्यवंशी,रमेश चौधरी,डॉ.मालठाणे, विष्णू ठाकरे,शिंदे गुरुजी, रवी अप्पा,प्रा राजेंद्र साळुंखे,विनोद दांडगे,गणेश पाटील कोमल वाघ,मोनूभाऊ वाघ, आदी उपस्थित होते.